बेकायदेशीर कामकाजामुळे बाणेर येथील तेजस्विनी सोसायटी अवसायानात (रद्द) काढण्याबाबत उपनिबंधक कार्यालयाची प्रक्रिया सुरू

बाणेर : औंध बाणेर हद्दीवरील बाणेर येथील तेजस्विनी सोसायटी मधील गैरकारभार व  बेकायदेशीर कामकाज यामुळे उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडून सोसायटी अवसायनात काढण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सोसायटी मधील बेकायदेशीर कामकाजाबाबत उपनिबंधकांच्या वतीने प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. सोसायटीचे सभासद प्रवीण नवले यांनी माहिती अधिकारात सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त व अन्य माहिती मागून देखील देण्यात आली नाही. प्रशासकाच्या नियुक्तीनंतरही माहिती देण्यात येत नसल्यामुळे उपनिबंधकांच्या माध्यमातून सोसायटी रद्द करण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सोसायटीचे ऑडिट रिपोर्ट, सोसायटीच्या निवडणुकांची माहिती तसेच सर्वसाधारण सर्वांचे इतिवृत्त मागून देखील उपनिबंधक कार्यालयाकडे जमा करण्यात आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत सोसायटी धारकांनी 22 सप्टेंबर 2025 पर्यंत समक्ष उपस्थित राहून लेखी खुलासा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. 

See also  श्वास आणि पाण्यापेक्षा मानवी जीवनामध्ये काहीच किमती नाही - सोनम वांगचुंग; मुळा नदी वाचवण्यासाठी बाणेर मध्ये चिपको मोर्चा अभिनेते सयाजी शिंदे व सोनम वांगचुंग यांचा सहभाग