सुस बाणेर बालेवाडी प्रभाग 9 मधील महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांची गोपनीय बैठक

बाणेर : सुस बाणेर बालेवाडी प्रभाग क्रमांक नऊ मधील महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची एक गोपनीय बैठक बाणेर येथील हॉटेलमध्ये पार पडली.‌ या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पूर्ण ताकदीनिशी सर्व गावांमध्ये मुद्द्यांच्या आधारावर प्रचार करतील अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

पाषाण, सुतारवाडी, उत्तर बाणेर, दक्षिण बाणेर, बालेवाडी, सुस महाळुंगे, सोमेश्वरवाडी, विधातेवस्ती परिसरातील महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार यावेळी उपस्थित होते.

भाजपा रडीचा डाव करत असून सुमारे एक लाख तीस हजारापेक्षा अधिक मतदार संख्या असलेला प्रभाग तयार केला आहे. सात गावांचा परिसर असलेला हा प्रभाग जिंकण्यासाठी तसेच मतदारांपर्यंत महाविकास आघाडीच्या भूमिका पोहोचवण्यासाठी यंत्रणा तयार करावी लागणार असून याबाबत समन्वय साधण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) परिसराचा विकास करण्यास अपयशी ठरले आहेत. नागरिक त्रस्त असून याकडे सत्ताधारी व प्रशासन दुर्लक्ष करत आहे. यासाठी महाविकास आघाडीची एकत्रित शक्ती नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निर्माण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

इच्छुक उमेदवारांची ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात असून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पॅनलला आव्हान उभे करणारे पहिले पाऊल मानले जात आहे.

See also  पुणे मनपातील राज्य सरकारमधील कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याची माजी नगरसेवक उज्वल केसकर यांची मागणी