पुणे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक विभागाचे अध्यक्ष प्रा. प्रकाशजी सोनवणे यांच्या सूचनेनुसार नुकत्याच पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात श्री. विजय श्रीवास्तव यांची वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघाच्या शिक्षक काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
हा नियुक्ती सोहळा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. अरविंदजी शिंदे, वडगांवशेरी विधानसभा ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा. राजुजी ठोंबरे, पुणे शहर जिल्हा शिक्षक काँग्रेस अध्यक्ष श्री. धोंडीबाजी तरटे सर आणि महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रा. सचिन दुर्गाडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते श्री . विजय श्रीवास्तव यांनी अधिकृत नियुक्तीपत्र स्वीकारले.नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर बोलताना श्री. विजय श्रीवास्तव म्हणाले, “शिक्षक हा समाज परिवर्तनाचा कणा असून, काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीनुसार शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढण्याची आणि संघटन बळकट करण्याची ही जबाबदारी मला दिली गेली आहे. पक्षश्रेष्ठींनी दाखवलेल्या विश्वासाला मी न्याय देईन.”
नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर बोलताना श्री. विजय श्रीवास्तव म्हणाले, “शिक्षक हा समाज परिवर्तनाचा कणा असून, काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीनुसार शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढण्याची आणि संघटन बळकट करण्याची ही जबाबदारी मला दिली गेली आहे. पक्षश्रेष्ठींनी दाखवलेल्या विश्वासाला मी न्याय देईन.”
या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन स्थानिक काँग्रेस शिक्षक विभागाने केले होते.या निवडीमुळे वडगांवशेरी विधानसभा क्षेत्रात शिक्षक काँग्रेसच्या कार्याला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.