बाणेर : बाणेर येथील वाहतूक कोंडीच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या माजी खासदार वंदना चव्हाण यांच्या प्रयत्नातून पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची बाणेर येथील रस्त्याची जागा पाहणी करण्यात आली. बाणेर येथील दत्त मंदिर, पॅन कार्ड रोड परिसरामध्ये अरुंद नसते असल्यामुळे धनकुडे वस्ती व पॅन कार्ड कडे जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. या परिसरातील अरुंद रस्ते व ओढ्याची समस्या तसेच अतिक्रमणे याची पाहणी आयुक्तांनी यावेळी केली.
पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता (पथ) अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त (घनकचरा) संदीप कदम, उपायुक्त (परिमंडळ २) संतोष वारुळे, सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, अधिक्षक अभियंता (पाणी पुरवठा) प्रसन्न जोशी, कार्यकारी अभियंता (बांधकाम) जयवंत पवार, अधिक्षक अभियंता (पथ विभाग) अभिजित आंबेकर, प्रकाश पवार, रमेश वाघमारे, दिलीप काळे,योगिता भांबरे, शिवानंद पाटील, प्रल्हाद पवार आदी अधिकारी उपस्थित होते.
वाहतूक समस्या सोडवण्यासाठी रस्त्यामध्ये येणाऱ्या जागांबाबत मूळ जागा मालकांशी चर्चा करून त्यांना योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. विकासकामे करताना नागरिकांचे हित, पारदर्शकता आणि कायदेशीर प्रक्रिया या तत्त्वांचे पालन करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यावेळी उपस्थित होते.
जयेश मुरकुटे म्हणाले, माजी खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या नेत्या वंदना चव्हाण यांनी बाणेर येथील वाहतूक कोंडीच्या प्रश्ना संदर्भात तसेच पॅन कार्ड रोडवरील समस्यांबाबत पुणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली होती. दरम्यान प्रत्यक्ष जागा पाहणे करण्याची मागणी यावेळी वंदना चव्हाण यांनी केली होती त्यानुसार बाणेर येथील रखडलेल्या रस्त्यांची पाहणी मनपा आयुक्त नवल किशोर राम व वंदना चव्हाण यांनी केली. यामुळे बाणेर परिसरातील महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत होणार आहे.