कोथरूड : पुणे येथे कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक जयदीप पडवळ यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे 51 हजार रुपये मदतीचा चेक सुपूर्द केला.
कोथरूड मतदार संघातील शिवसैनिक व पुणे मनपा वृक्ष संवर्धन समितीचे माजी सदस्य जयदीप पडवळ यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेना सहाय्यता निधी मध्ये चेक द्वारे देणगी दिली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जयदीप पडवळ यांचे कौतुक केले. समाजाभिमुख काम करत राहण्यासाठी शुभेच्छा यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, संपर्कनेते आमदार सचिन आहिर, वसंत मोरे, शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे तसेच कोथरूड मतदार संघातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.