सांगवी : मृत्युंजय एज्युकेशन सोसायटीचे नृसिंह हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, सांगवी येथे कार्यरत प्राचार्य अशोक दिनकर संकपाळ सर हे सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापुर्ती निमित्त त्यांना सन्मानचिन्ह देवुन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
शाळेतील सर्वांचे लाडके शिक्षक शरद एकनाथ ढोरे यांची मृत्युंजय एज्युकेशन सोसायटीच्या नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सांगवी येथे “प्राचार्य”पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देवुन माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी टीम एनएचएस चे सदस्य उपस्थित होते.