पाषाण : राहुल कोकाटे यांच्या सहकार्याने कोकाटे तालिम मंडळाचा गणेशोत्सव सजावट स्पर्धा 2025 चा बक्षीस वितरण समारंभ पाषाण, सुस रोड येथील शुभतेज मंगल कार्यालयात पार पडला.
पाषाण परिसरातील पस्तीस सोसायटी या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या,उत्कृष्ट सजावट प्रकारात क्रिस्टल गार्डन सोसायटीचा प्रथम, तर साई विहार सोसायटीचा द्वितीय व लेक व्हिव सोसायटीचा तृतीय क्रमांक याला.सांस्कृतिक उपक्रम प्रकारात स्वामी समर्थ व अलंकापुरी सोसायटींला प्रथम क्रमांक विभागून तर द्वितीय क्रमांक VTP साॅलिटर सोसायटी व तृतीय क्रमांक व्हेनेझिया सोसायटीने पटकावला. सामाजिक उपक्रम प्रकारात पुर्वा हाईट्स व कॅमेलिया सोसायटीत विभागून देण्यात आला तर माऊंट व्हर्ट ड्यु व कुमार प्रियदर्शन सोसायटीस द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आला.
श्री गिरीश चोक, अमोल पाटील,किशोर मोरे,उत्तम जाधव यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
माजी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, रोहिणी चिमटे,लहु बालवडकर, बालम तात्या सुतार, आबासाहेब सुतार, गोविंद रणपिसे, अँड. नितिन कोकाटे, संतसेवक मारुती कोकाटे,सुरेश कोकाटे, अंबादास कोकाटे व फॅस्काॅम महाराष्ट्रचे अध्यक्ष अरुण रोडे ,रत्नाकर मानकर यांच्या शुभहस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
राहुल कोकाटे व मयुरीताई कोकाटे या स्पर्धेचा माध्यमातून पाषाण परिसरातील सोसायटीस एकत्र आणतात व सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक वातावरण सक्षम करण्यात पुढाकार घेतात, सोसायटीतील नागरिकांचे कार्यकुशलता समाजापुढे आणतात त्यांच्या समाजा कार्यास खुप शुभेच्छा अशा भावना सोसायटी विभागाच्या वतीने सौ संजीवनी औटी यांनी व्यक्त केल्या
प्रविण आमले,विकास पाटील, प्रज्वल कोकाटे,अमित ववले यांनी या स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले.


























