औंध : औंधसह कस्तुरबा वसाहत आणि रजनीगंधा सोसायटी परिसरात बिबट्या दिसल्याची नोंद झाली आहे. याची गंभीर दखल घेत वनविभागाने शोधमोहीम सुरू केली आहे.
सुरक्षिततेसाठी काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. पाळीव प्राणी घराबाहेर सोडू नका.
सायंकाळी 5 नंतर घरातील व कंपाऊंडमधील सर्व लाईट सुरू ठेवा.
घराचे सर्व गेट्स आणि दरवाजे बंद ठेवा. कुठलीही हालचाल किंवा संशयास्पद गोष्ट दिसल्यास 100 नंबर वर तात्काळ संपर्क करा.
आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. पहाटे तसेच रात्री उशिरा बाहेर जाणे टाळा. विशेषतः लहान मुलं व ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रशासन व सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
औंध परिसरामध्ये बिबट्या आढळल्याच्या वृत्ताला वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला असून यामुळे परिसरामध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये बिबट्या आल्याने परिसरातील नागरिक देखील भीती व्यक्त करत आहे.























