सुस–बाणेर–पाषाण प्रभाग ९ मधून पार्वती अजय निम्हण यांचे नाव चर्चेत
भाजपा परिवर्तनाच्या भूमिकेत; निम्हण कुटुंबाची राजकीय चाचपणी सुरू

पुणे : सुस–बाणेर–पाषाण प्रभाग क्रमांक ९ मधून आगामी निवडणुकीसाठी पार्वती अजय निम्हण या इच्छुक उमेदवार म्हणून पुढे येत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरताना दिसत आहे. विशेषतः यावेळी भाजपाकडून पाषाण परिसरात परिवर्तनाचा विचार केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर निम्हण कुटुंबात उमेदवारीबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

स्थानिक पातळीवर सामाजिक व राजकीय प्रभाव असलेले निम्हण कुटुंब हे या प्रभागातील परिचित नाव मानले जाते. पार्वती अजय निम्हण यांच्या नावाची चर्चा वाढण्यामागे त्यांची स्थानिक संपर्कशक्ती, सामाजिक सहभाग आणि कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी महत्त्वाची ठरत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये अजय निम्हण हे सध्या महत्त्वाच्या पदावर कार्यरत असून त्यांचा स्थानिक संघटनांवर चांगला प्रभाव आहे. या राजकीय पार्श्वभूमीमुळे पार्वती निम्हण यांची संभाव्य उमेदवारी ही सुस–बाणेर–पाषाण परिसरात राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

महत्त्वाचे म्हणजे, पार्वती अजय निम्हण येत्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त राजकीय सूत्रांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय हालचालींना वेग आला असून, सर्वच पक्षांचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे.

आगामी दिवसांत उमेदवारीच्या अधिकृत घोषणेसह या प्रभागातील राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.

See also  सुसगाव परिसरामध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त