पुणे (औंध) : औंध व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सदस्य नाना वाळके यांनी आज मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
या प्रसंगी शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, रवी साळेगावकर, सन्नी निम्हण, हेमंत डाबी, सागर परदेशी, सुनील हरिश्चंद्रे, स्वप्निल नागरस, गणेश घाडगे, अमित वाळके, किसन पाटील, किरण खैरे, विक्रम गोरे, प्रल्हाद निर्मल, राज सगर, काळूराम पोडमाल, प्रवीण चव्हाण, यश सगर, अमर गोस्वामी, प्रशांत ठोसर, प्रमोद प्रतापे, अंकुश धनवे, मनीष रॉय, गणेश बाबर, निखिल जाधव, अमित शिंदे, वैभव प्रभाकर आदी उपस्थित होते. नाना वाळके यांच्या प्रवेशामुळे औंध परिसरातील व्यापारी वर्गात भाजपाची पकड अधिक मजबूत होणार असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.
विशेषतः प्रभाग क्रमांक ९ (सुस-बाणेर-पाषाण) आणि प्रभाग क्रमांक ८ या भागांमध्ये नाना वाळके यांचा प्रभाव लक्षात घेता, त्यांच्या प्रवेशाचा आगामी निवडणुकांमध्ये भाजपाच्या उमेदवारांना निश्चितच फायदा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. व्यापारी संघटनांमध्ये सक्रिय सहभाग आणि स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका यामुळे नाना वाळके यांना औंध परिसरात चांगला जनाधार आहे.
या प्रवेशामुळे औंध भागातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, भाजपासाठी हा प्रवेश रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.























