मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणारा विकासाचा आराखडा जयेश संजय मुरकुटे जनतेच्या पसंतीचा चेहरा

बाणेर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयेश संजय मुरकुटे यांनी परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन सविस्तर विकासात्मक भूमिका मांडली आहे. पाणी, रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य सुविधा या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचा त्यांचा निर्धार आहे.

परिसरातील पाणीटंचाई, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा आणि अनियमित वेळापत्रक या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा नियोजन, पाइपलाइन दुरुस्ती व योग्य पाणीसाठा व्यवस्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.तसेच खराब व अरुंद रस्ते, वाढती वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा अभाव यामुळे नागरिक त्रस्त असून, यासाठी रस्ते रुंदीकरण, नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक नियमनावर भर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

ड्रेनेज व सांडपाणी व्यवस्थापनातील त्रुटींमुळे पावसाळ्यात होणारी पाणी साचण्याची समस्या लक्षात घेता, संपूर्ण परिसरात ड्रेनेज लाईनची तपासणी, दुरुस्ती आणि आवश्यक ठिकाणी नवीन लाईन टाकण्याचा प्रस्ताव त्यांच्या अजेंड्यात समाविष्ट आहे.कचरा संकलन व वर्गीकरणाची प्रभावी व्यवस्था नसल्याने निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक प्रश्नांवर उपाय म्हणून ओला-सुका कचरा वेगळा करण्याची सक्ती, नियमित कचरा उचल आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योग्य नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आरोग्याच्या दृष्टीने परिसरात प्राथमिक आरोग्य सेवा, स्वच्छता आणि डास-डेंग्यू नियंत्रणासाठी नियमित फवारणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या सर्व मुद्द्यांवर ठोस भूमिका आणि नियोजनबद्ध उपाय मांडल्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, काम करणारा आणि प्रश्न समजून घेणारा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. सध्याच्या जनमताचा कल पाहता, त्यांच्या विजयाची शक्यता बळकट होत असल्याचे चित्र आहे.

See also  महाळुंगे येथे राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ पुनम विधाते यांचा पत्रके वाटप करून प्रचार