भाजपच्या प्रभाग क्रमांक ११ मधील पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद

कोथरूड : भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक ११ मधील पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ताशांच्या गजरात, ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी, भाजपच्या विजयाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही या पदयात्रेत सहभागी होत, गाडीच्या टपावर उभारून नागरिकांना संबोधित केले.

भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक ११ चे उमेदवार अजय मारणे, अभिजीत राऊत, मनीषा बुटाला, शर्मिला शिंदे यांच्या प्रचारार्थ आज कोथरुड मधील पौड फाटा देवी मंदिर, केळेवाडी हनुमाननगर भागात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पौड फाटा येथील दुर्गामाता मंदिर येथून या रॅलीचा प्रारंभ झाला. पौडफाटा दुर्गामाता मंदिर, केळेवाडी, हनुमान नगर, मोरे विद्यालय, रामबाग कॅालनी, शिवतीर्थ नगर, जयभवानी नगर, म्हातोबादरा आणि सुतारदरा दरम्यान रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीमध्ये महिलांचा आणि तरुणांचा सहभाग अतिशय मोठा होता.

ना. चंद्रकांतदादा पाटील यावेळी म्हणाले की, कोथरुडकरांनी दोनवेळा मला निवडून दिले. गेल्या सहा वर्षात कोथरुड मधील नागरिकांच्या गरजा ओळखून अनेक विकासकामांसह लोकोपयोगी उपक्रम राबवले आहेत. मानसी, सुखदा सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील माझ्या लेकींसाठी काम करण्याची संधी मिळाली. विरोधकांनाही हे उपक्रम केवळ निवडणुकीसाठीच आहेत, असा अपप्रचार करत होते. पण विधानसभा निवडणुकीनंतर अजूनही हे उपक्रम सुरुच आहेत; भविष्यात ही सुरुच राहितील अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

प्रभाग क्रमांक ११ मधील रॅलीला आणि समारोप सभेला मिळालेला तुफान प्रतिसाद पाहून ही विजयी सभा असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, विकासाची ही गती कायम राखण्यासाठी विधानसभा निवडणुकीत जसे मला विजयी केले; त्याचप्रमाणे पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ मधील भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे. तसेच, कोणत्याही दमदाटीला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले.

दरम्यान, या पदयात्रेत ठिकठिकाणी महिलांनी ना. चंद्रकांतदादा पाटील आणि भाजपच्या सर्व उमेदवारांचे औक्षण करुन विजयासाठी शुभेच्छा दिल्या. या रॅलीचा मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर विरोधकांमध्ये धडकी भरल्याची चर्चा सध्या प्रभागात रंगली आहे.

See also  सैनिक कल्याण विभागात करार पद्धतीने विधी सल्लागार नेमणुकीसाठी अर्ज करण्याचे आवाहन