पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आज काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा प्राची दुधाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी प्राची दुधाणे म्हणाल्या की, ‘‘आज ज्ञानाई सावित्रीमाई यांचा स्मृतिदिन स्त्री शिक्षण, सत्यशोधक समाज, प्रबोधन व प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक परिवर्तन करून मानवहीत जोपासणाऱ्या सावित्रीमाई. आईचा ‘अ’ ते ज्ञानाचा ‘ज्ञ’ प्रवास या माउलीच्या संघर्षाने शोषितांना, पीडितांना, वंचीत व शूद्र, शुद्रादिशुद्र यांना प्रगतीपथावर घेवून आला. आयुष्यभर इतरांसाठी संघर्ष केला, संपूर्ण आयुष्य तुम्हा आम्हासाठी झिजवले. प्लेगच्या रोगाने ग्रासलेल्यांची अहोरात्र सेवा केली. शेवट पर्यंत सावित्रीमाईने आपले उभे आयुष्य जसे समाजहितासाठी अर्पण केले, तसेच मृत्यूला देखील त्यांनी सहज कवेत घेतले. प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना सावित्रीमाईंचे प्लेगने १० मार्च १८९७ रोजी निधन झाले. धन्य ती माता ! सावित्रीमाई होत्या म्हणून आज मी व माझ्या असंख्य माता-भगिनी व बांधव आपल्या कार्याचा, कर्तृत्वाचा झेंडा अभिमानाने मिरवत आहेत. माझ्या या साऊला स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !’’

यावेळी प्राची दुधाणे यांच्या समवेत सीमा सावंत, अनिता धिमधिमे, प्रियंका मधाळे, सेवादलाचे लतेंद्र भिंगारे, दिलीप लोळगे, आकाश ढवळे, नरेश अवटे, पोपट पाटोळे आदी उपस्थित होते.

See also  चांदणी चौक रंगाला सजला पण बसथांबा उन्हातला?