पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पाली भवन उभारण्याबाबत विद्यापीठ प्रशासन आणि सामाजिक न्याय विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. करारावर विभागाच्यावतीने समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातर्फे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी स्वाक्षरी केली.
समाज कल्याण विभागाकडून प्राप्त होणाऱ्या १३ कोटीच्या निधीतून विद्यापीठ परिसरात पाली विभागाची स्वतंत्र इमारत उभी राहणार आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मान्यवर व्यक्तिंचे स्मारक बांधणे तसेच अनुसूचित जातीसाठी सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्व असलेल्या स्थळांचा विकास करणे, व अनुसूचित जातीच्या सांस्कृतिक व नीतिमूल्यांवर आधारित विकास साधणाऱ्या प्रकल्पांसाठी स्वयंसेवी संस्थाना अनुदान मंजूर करणे या सामाजिक न्याय विभागाच्या योजनेंतर्गत ही इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी शासन निर्णयानुसार १३ कोटी ३४ लाख ७५ हजार २१ इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात होती. आता यासंबंधी प्रत्यक्ष करारावर स्वाक्षरी झाल्याने पाली भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
इमारत बांधकामांमध्ये शासनाचा ९० टक्के हिस्सा असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १० टक्के हिस्सा आहे. शासनाच्या हिश्श्यापोटी ९० रक्कम रुपये १२ कोटी १ लक्ष २७ हजार ६८९ इतका निधी सावित्रीबाई फुले विद्यापीठ व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे कार्यालयाच्या संयुक्त खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे.
पाली भाषेच्या तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत इतर विभागाच्या शैक्षणिक प्रयोजनार्थ इमारतीचा वापर विद्यापीठात करता येणार आहे. आज विद्यापीठ परिसरात करण्यात आलेल्या सामंजस्य कराराच्यावेळी समाज कल्याण विभागाचे अधिकारी तसेच विद्यापीठाचे पाली विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
घर साहित्य/शैक्षणिक पुणे विद्यापीठात पाली भवन उभे राहणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी समाज कल्याण...