म्हाळुंगे : भारतीय योग संस्थानच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त आज म्हाळुंगे परिसरात विशेष योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेची स्थापना 10 एप्रिल 1967 रोजी स्व. प्रकाशलालजी यांनी केली असून आज संस्थेचे कार्य देशभर तसेच विदेशातही विस्तारले आहे. निःशुल्क योगाभ्यास वर्गांद्वारे नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला जात आहे.
या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सकाळी आयोजित सत्रामध्ये 3 ते 4 दर्जांचे योगासनांचे प्रात्यक्षिक व सामूहिक योगाभ्यास घेण्यात आला.
कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्त्या सौ. हर्षदा थिटे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगत नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. तसेच भारतीय योग संस्थानच्या कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्याबाबत जागरूकता वाढते, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन भारतीय योग संस्थानच्या स्थानिक शाखेच्या वतीने करण्यात आले होते.
























