“वाचाल तर वाचाल” संदेशाचा जागर- पुणे मनपामध्ये डॉ.आंबेडकर जयंती निमित्त विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप

पुणे | प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तकांचे वाटप करण्यात आले. “वाचाल तर वाचाल” हा बाबासाहेबांचा प्रेरणादायी संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते क्षितिज गायकवाड यांनी बाबासाहेबांचे विचार आणि त्यांच्या जीवनकार्याचा सखोल आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संविधानाने दिलेले अधिकार, कर्तव्ये आणि शिक्षणाचे महत्त्व त्यांनी प्रभावी शब्दांत मांडले.

यावेळी मंजुषा दीपक नागपुरे, निलेश निकम, हिमाली कांबळे, अरुण राजवाडे, स्वप्नाली पंडित, अर्चना जगताप तसेच वसुंधरा बारवे उपस्थित होते.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला. शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून आणण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

See also  रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता मेळावा