बावधनमध्ये ‘भीम फेस्टिवल 2026’ उत्साहात संपन्न

पुणे: विकास प्रतिष्ठान व सुजाता महिला मंडळ, बावधन यांच्या वतीने सिद्धार्थ नगर, बावधन येथे ‘भीम फेस्टिवल 2026’चे भव्य आणि दिमाखदार आयोजन करण्यात आले.

या निमित्ताने महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक विशाल-साजन यांचा ‘आंबेडकरी फोक’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाने उपस्थितांना प्रेरणादायी आणि सांस्कृतिक अनुभव दिला.

कार्यक्रमादरम्यान पुणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. हा सत्कार शिक्षणमहर्षी मा. राजेंद्र बांदल यांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच प्रभाग क्रमांक १० मधील विविध नगरसेवकांचाही नागरी सत्कार करण्यात आला.

सन्मानित मान्यवरांमध्ये किरण दगडे पाटील, दिलीप (अण्णा) वेडे पाटील, निशा मानवतकर (स्थायी समिती सदस्य), अल्पना गणेश वरपे (महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा) तसेच रुपाली पवार यांचा समावेश होता.

यावेळी बावधन गावच्या माजी सरपंच वैशाली कांबळे, विशाल शेलार, स्वराज कांबळे, मुख्य आयोजक यशराज उमेश कांबळे, सदाभाऊ घुले, धनंजय दगडे पाटील, सूर्यकांत भूडे, दत्ताजी जाधव, रेखाताई सरोदे तसेच दिनकरजी चंदनशिवे यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली.

रिपब्लिकन पक्षाचे युवक राज्य संघटक उमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

See also  लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्जरामटेकमध्ये २४०५ तर नागपूरमध्ये २१०५ मतदान केंद्रे