औंध : पुणे महानगरपालिका प्रभाग क्र. ८ अंतर्गत असलेल्या वि. भा. पाटील जलतरण विभाग व व्यायामशाळा तसेच औंध गाव जलतरण तलावाची आज उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी क्रीडा व जलतरण सुविधांची सद्यस्थिती, उपलब्ध सोयी-सुविधा तसेच आवश्यक दुरुस्ती आणि विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.या पाहणी दौऱ्यात पुणे महानगरपालिकेचे सभासद सनी निम्हण आणि सपना छाजेड उपस्थित होते. तसेच क्रीडा विभागाचे उपायुक्त डॉ. संतोष टेंगले, सहाय्यक आयुक्त गोविंद दांगट, क्रीडा अधिकारी शिवराज राक्षे, भवन विभागाच्या शाखा अभियंता वर्षाराणी खेमनार, मालमत्ता विभागाचे अभियंता आदेश गजभिये आणि औंध क्षेत्रीय कार्यालयाचे उपअभियंता दिपक लांडे यांनी सहभाग घेतला.
या पाहणी दौऱ्यात पुणे महानगरपालिकेचे सभासद सनी निम्हण आणि सपना छाजेड उपस्थित होते. तसेच क्रीडा विभागाचे उपायुक्त डॉ. संतोष टेंगले, सहाय्यक आयुक्त गोविंद दांगट, क्रीडा अधिकारी शिवराज राक्षे, भवन विभागाच्या शाखा अभियंता वर्षाराणी खेमनार, मालमत्ता विभागाचे अभियंता आदेश गजभिये आणि औंध क्षेत्रीय कार्यालयाचे उपअभियंता दिपक लांडे यांनी सहभाग घेतला.
पाहणीदरम्यान जलतरणपटू, क्रीडाप्रेमी आणि स्थानिक नागरिकांना अधिक दर्जेदार व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. जलतरण तलाव आणि व्यायामशाळेच्या देखभाल, दुरुस्ती तसेच विकासकामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
क्रीडा सुविधा अधिक सक्षम, आधुनिक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सांगितले. नागरिकांना उत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यास महापालिका कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
















