पाषाण येथे नगरसेविका मयुरीताई कोकाटे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा ; शेकडो नागरिकांचा सहभाग, ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ चा नारा

पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सकाळी पाषाण येथील लोकसेवा स्कूल येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. राहुल दादा कोकाटे मित्रपरिवार व लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित या कार्यक्रमात परिसरातील शेकडो नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक व युवक-युवतींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

सकाळी ठीक 6:30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रसिद्ध योग प्रशिक्षक श्री रामदास ठोसर व सौ ममता त्रिपाठी यांनी उपस्थितांना सूर्यनमस्कार, विविध आसने व प्राणायामाचे महत्त्व पटवून देत प्रात्यक्षिके करून घेतली. ‘योगा बाय द योगा’ या संकल्पनेवर आधारित या सत्रात सर्व वयोगटातील नागरिकांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री गिरीश चौक श्री रत्नाकर मानकर श्री रघुनाथ उत्पात श्री चंद्रकांत जाधव उपस्थित होते. आयोजक श्री राहुल कोकाटे यांनी आपल्या मनोगतात, “आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीत योग हेच खरे औषध आहे. पंतप्रधानांनी दिलेल्या ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या संदेशाचा अवलंब करून प्रत्येकाने योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवावे,” असे आवाहन केले.

कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने झाली. उपस्थित सर्व नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन पुस्तिका व योगा टी-शर्ट चे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओमकार योग साधना केंद्र, अमृतवेल योगा, नवचैतन्य हास्य क्लब, व भाजपचे पदाधिकारी श्री उत्तम जाधव व नवनाथ ववले कोकाटे तालीम मंडळ च्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

See also  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्य संघटक पदी निवड झाल्याबद्दल बाळासाहेब भांडे यांचा मुळशी तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने सत्कार