वारकऱ्यांच्या सेवेसाठी मनसेकडून फराळ वाटप; विविध सेवाभावी व्यक्तींचा सन्मान

पुणे, प्रतिनिधी : आषाढी वारीनिमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर, मनसे अधिकृत लोकसेवा प्रतिष्ठान आणि जय जंगली महाराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पाटील इस्टेट येथील क्रांतिवीर लहुजी वस्ताद चौकात वारकऱ्यांसाठी फराळ वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी वारकऱ्यांसह वारीत सेवा बजावणारे वासुदेव, गंधटिका लावणारे, बेलफुले विक्रेते, रांगोळी कलाकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा श्री पांडुरंगाची मूर्ती भेट देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन मनसे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमास गोकुळ अडागळे, अँथोनी आढाव, निलेश रणदिवे, मिलन भोरडे, सम्राट सोरटे, निलेश निकम, गोविंद रणपिसे, केरबा जौंजट, राजाभाऊ भेकरे, रोहन नडीमेटला, रमेश साठे, मुसा शेख, चांद मुलानी, मुकुंद कांबळे, सलीम शेख, दिलीप खिलारे, सज्जन नरवडे, सरस्वती अडागळे, वहिदा शेख, समीक्षा अडागळे, सागर अडागळे, अनुजा अडागळे, रितेश अडागळे, अभी वाघमारे, साक्षीता आढाव, अजय वाघमारे, मोहित अडागळे, श्रद्धा बोरगे, मनिषा परदेशी, अनुष्का आढाव, साधना जौंजट यांच्यासह असंख्य मनसैनिक उपस्थित होते.

वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी होत समाजात सेवाभाव आणि भक्तीची परंपरा जपण्याचा हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

See also  आंब्याचे मार्केटिंग करताना क्यूआर कोडचा वापर करावा – पालकमंत्री दीपक केसरकर