मुळशी तालुक्यातील २५० गरजू विद्यार्थ्यांना कीर्तीशक्ती फाऊंडेशनकडून मोफत रेनकोट वाटप

बाणेर : बाणेर येथील *कीर्तीशक्ती फाऊंडेशन च्या वतीने मुळशी तालुक्यातील स्वामी विवेकानंद विद्यालयातील २५० गरजू विद्यार्थ्यांना* मोफत रेनकोटचे वितरण करण्यात आले.

मुळशी तालुक्यात दरवर्षी मुसळधार पाऊस पडत असल्याने परिसरातील गावांमधून तसेच शाळेच्या वसतिगृहातील अनेक विद्यार्थी पायी शाळेत ये-जा करतात. त्यामुळे पावसात भिजून विद्यार्थी आजारी पडू नयेत तसेच त्यांची दप्तर, वह्या व पुस्तके सुरक्षित राहावीत आणि पावसामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

विद्यार्थ्यांची ही गरज ओळखून कीर्तीशक्ती फाऊंडेशनने २५० विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट उपलब्ध करून दिले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची पावसाळ्यातील शाळेतील उपस्थिती वाढण्यास आणि त्यांचे शिक्षण अखंडित सुरू राहण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. सतीश शिंदे, विद्यार्थी वसतिगृह प्रमुख श्री. राठोड, विद्यार्थिनी वसतिगृह संचालिका सौ. स्वाती कदम, शाळेचे शिक्षकवृंद तसेच कीर्तीशक्ती फाऊंडेशनच्या डायरेक्टर सौ. कल्याणी टोकेकर, सौ. शिखा नीखरा आणि श्री. ब्रिजेश राय उपस्थित होते.

See also  मनसेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप