पुणे, दि. ४ : संकष्टी चतुर्थीच्या पावन निमित्ताने संडे हायकर्स परिवार, पुणे यांनी लोणावळा ते भीमाशंकर परिक्रमा करताना सामाजिक बांधिलकी जपत पढरवाडी परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तू वाटपाचा उपक्रम राबविला.
या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल तसेच इतर शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. “विद्यार्थी सेवा हीच ईश्वर सेवा” हा संदेश मनात ठेवून संडे हायकर्स परिवारातील सदस्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपुलकीने व निस्वार्थ भावनेने हा उपक्रम पार पाडला.
या सामाजिक उपक्रमाला संडे हायकर्स परिवाराच्या सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच पढरवाडी परिसरातील पालकांनी या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.
यावेळी संडे हायकर्स परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक आनंद अंकम यांच्यासह गीता टेके, गीता भोळे, अरुंधती, मुक्ता, पौर्णिमा, राजेंद्र, विनोद, विजय, महेश, प्रफुल्ल, अमोल, रजनीश, अनंथ, मकरंद, जयदीप, महेंद्र, प्रशांत आणि शिरीष यांनी शालेय वस्तू वाटप कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आनंद अंकम, किरण टेके, अविनाश पाटील आणि संजय सूर्यवंशी यांनी विशेष सहकार्य केले.
सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि शिक्षणाप्रती असलेली संवेदनशीलता जपणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकास पात्र ठरला.














