वडकीत नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिक प्रश्नमंजुषा स्पर्धा; १४३ महिलांचा सहभाग

वडकी : अखिल सार्वजनिक नवरात्र उत्सव २०२६, वडकी यांच्या वतीने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून थोर महापुरुष, देव, देश, धर्म, संस्कृती, सण-उत्सव तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित लेखी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १४३ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या स्पर्धेत सौ. वंदना सुरेश चाकणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक सौ. शुभांगी सुधाकर पोखरकर, तृतीय क्रमांक सौ. सुमती बाळू काकडे, चतुर्थ क्रमांक सौ. राणी प्रकाश सुळे, तर पाचवा क्रमांक सौ. मेघा कैलास गपाट यांनी मिळविला.

स्पर्धेचे नियोजन सौ. माधुरी वैद्य, सौ. रूपाली सावंत, सौ. शीला चव्हाण, सौ. अंकिता कदम, श्रीकृष्ण लोंढे, राहुल काळेल आणि कैलास ओझा यांनी केले. या कार्यक्रमासाठी युवा उद्योजक साई राजेंद्र मोडक तसेच महिला उद्योजक सौ. विद्या तानाजी मोडक, सौ. वैशाली सुनील मोडक, सौ. मोनाली संदिप लाड आणि कोमल सहदेव वाळुंजकर यांचे सौजन्य लाभले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांना दांडियांचे वाटप करण्यात आले. तसेच विजेत्या महिलांना ट्रॉफी, पाच लिटरचा पाण्याचा जार आणि साडी अशा भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला मंडळाचे संस्थापक सुभाषदादा मोडक, अध्यक्ष तानाजी मोडक, उपाध्यक्ष अविनाश मोडक, खजिनदार योगेश मोडक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय फडके, सुरेश शिंदे, सुनील वराळे, संतोष सावंत, आनंद सूर्यवंशी, लखन वाघमारे, प्रमोद तांबे, दत्तात्रय बोराटे, सुरेश नलावडे, क्षीरसागर साहेब तसेच मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तानाजी मोडक म्हणाले, “अशा प्रकारचे उपक्रम प्रत्येक उत्सवात आयोजित होणे गरजेचे आहे. यामुळे महिलांना आपल्या इतिहासाची, संस्कृतीची तसेच देव, देश आणि धर्माविषयीची माहिती मिळते. महिलांच्या माध्यमातून ही माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होते. अशा स्पर्धांमुळे ज्ञानवृद्धीसोबतच सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडते.”

See also  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची लोणावळा बसस्थानकाला भेटबसस्थानक परिसराची केली पाहणी; प्रवाशांशी साधला संवाद