महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांची सिटी प्राईड कोथरूड परिसरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईस प्रत्यक्ष भेट व पाहणी

कोथरूड : पुणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच बांधकाम नियमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सिटी प्राईड कोथरूड परिसरास प्रत्यक्ष भेट दिली.

यावेळी इमारतीच्या फ्रंट मार्जिन, साईड मार्जिन तसेच खासगी जागेतील अनधिकृत बांधकामांवर करण्यात येत असलेल्या संयुक्त कारवाईची आयुक्त महोदयांनी पाहणी केली. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाईची माहिती जाणून घेतली.

शहरातील अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे, बांधकाम नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करणे याबाबत पुणे महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असून, अशा कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहेत.

या वेळी मा. सहाय्यक आयुक्त श्रीमती अस्मिता तांबे, बांधकाम विकास विभाग झोन क्र. ६ चे अधिकारी तसेच वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

See also  समर्थ पथ, कर्वेनगरमध्ये पुन्हा पूरस्थिती; पावसाळी लाईन कामावर प्रश्नचिन्ह