तरूणांचा चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देते – दीपक मानकर
सनी मानकर आणि गिरीश गुरनानी यांच्या नोकरी महोत्सवामुळे अनेक कुटुंबांना मिळाला आधार

पुणे – नोकरी मिळाल्याचा आनंद तरूणांच्या चेहऱ्यावरील पाहिल्यावर खऱ्या अर्थाने वाढदिवस सार्थकी झाला असे वाटते. हा आनंद सनी आणि गिरीश यांनी दिला असून, असा स्तुत्य उपक्रमाचे सर्वांनी अनुकरण करावे, असा भावना राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी व्यक्त केले.

दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे प्रदेश प्रभारी सनी मानकर आणि कोथरूड युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी आयोजीत नोकरी महोत्सवाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार ऍड. वंदना चव्हाण, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा ,युवक शहर अध्यक्ष किशोर कांबळे, कोथरूड अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र सरकार रोजगार घालवते तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देते, ही कौतुकास्पद बाब आहे, असे ऍड. वंदना चव्हाण यांनी सांगितले.

सनी आणि गिरीश हे नेहमी समाजाला उपयोगी असे उपक्रम घेत असतात, सध्या रोजगार महोत्सव ही गरज असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.

या महोत्सवात 540 तरूणांनी रजिस्टेशन करून मुलाखती दिल्या. त्यातील 95 तरूणांना तात्काळ नोकरीची संधी मिळाली, तर अन्य तरूणांचे दुसऱ्या फेरीत नोकरी संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सनी मानकर आणि गिरीश गुरनानी यांनी दिली.

See also  कोथरूड येथील कचरा वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकांच्या समस्या उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहोचवणार - विजय डाकले