10 वीचा पेरिविंकल इंग्लिश मीडियम शाळेची 100% निकालाची परंपरा कायम

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या बावधन, सूस व पिरंगुट या सर्व शाखानी 12वी चा 100% निकालाचा झेंडा फडकावत 10 वी च्या 100% निकालाचा झेंडा उत्तुंग करून 100/%निकालाची परंपरा कायम ठेऊन या वर्षीही आपला अव्वल दर्जा कायम राखला आहे.
बावधन शाखेच्या सार्थक कंधारे व साहील सणस यांनी 94.20 % गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला तर पारूल चौधरी हिने 91.40% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर श्रावणी थोरात हीने 91% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
तसेच सूस शाखेमधून शिवांजली जाधव हिने 87% टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे तर सतीश यादव याने 85.80% गुण पटकावून द्वितीय क्रमांक मिळवला तसेच विक्रम इंदा व स्नेहल आढाव यांनी 85.20 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावून तृतीय बॅच ने 100%निकालाचा आदर्श घालून दिला.
पिरंगुट च्या प्रज्ञा हंद्रले हिने 92% गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावला तर श्रावणी तरल,पार्थ पंडित व शिवम मौर्य या तिघांनी 88.60% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला असून वेदांत मान्यवर याने 88.40% गुण घेऊन तिसरा क्रमांक मिळवला असून 100% निकालाचा लौकिक दाखऊन दिला. पेरिविंकल इंग्लीश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज च्या या चढत्या आलेखाचे व
या उत्तुंग यशाचे शिलेदार पेरिविंकल इंग्लीश मीडियम स्कूलस अँड जूनियर कॉलेजेस चे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल ,संचालिका सौ रेखा बांदल, बावधन शाखेच्या मुख्याध्यापिका रुचीरा खानविलकर, पर्यवेक्षक अस्मिता पाठक , रश्मी पाथरकर वर्गशिक्षिका स्वाती कोल्हे व विद्या झोपे तसेच सूस शाखेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित , पर्यवेक्षिका शुभा कुलकर्णी, सचिन खोडके, माधुरी धावडे वर्गशिक्षिका योगीता धाने तर पिरंगुट शाखेचे मुख्याध्यापक अभिजित टकले, पर्यवेक्षिका पूनम पांढरे, सना इनामदार , पल्लवी वर्गशिक्षिका तसेच वर्गशिक्षिका रेशमा भोसले या सर्वांनी या निकालासाठी अथ:क परिश्रम घेउन हे १00% निकालाचे अवजड शिवधनुष्य पेलले.
सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्याच्या अथक प्रयत्नांनी हे यश प्राप्त झाले आहे यात तिळमात्र ही शंका नाही. शाळेचा केवळ 100% निकाल लागला नसून सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून निकालाच्या या वाट्याचे श्रेय हे पेरिविंकल समूहाचे सर्व मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक , विद्यार्थी व पालकवर्ग या सर्वांना जाते असे प्रतिपादन पेरिविंकल इंग्लीश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल यांनी सर्वांचे अभिनंदन करताना केले.

See also  प्रत्येकी एक हजार रुपये नोंदणी शुल्क व मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतजमिनीची अदला बदल करण्याची सलोखा योजना राज्यात कार्यान्वित- मुद्रांक महानिरीक्षक हिरालाल सोनवणे

विषेश प्राविण्य : कंधारे साहिल याने गणित विषयात 98/100 तर साहिल व श्रावणी थोरात यांनी सोशल स्टडीज मध्ये 98/100 गुण मिळवले आहेत तर चौधरी ने विज्ञान विषयात 97/100 गुण मिळवून गुणांची बाजी मारली आहे. तर 10 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवून गुणांची आतिशबाजी केली आहे.