सुतारवाडी येथे गुरूपौर्णिमा निमित्त धार्मिक सोहळा व महाप्रसादाचे आयोजन

सुतारवाडी : गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर, सुतारवाडी येथे विविध धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कीर्तन हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. भविष्यात पुढच्या पिढीला तंत्रज्ञानाबरोबर अध्यात्माची जोड मिळावी यासाठी शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांचे १४ वे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज पैठणकर यांच्या सुश्राव्य कीर्तन सेवेचा भाविक भक्तांनी लाभ घेतला. त्याचबरोबर गुरुपौर्णिमा निमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

See also  कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या प्रशिक्षणार्थी आरोग्य निरिक्षक व स्वच्छ समन्वयकाचा स्वच्छता ही सेवा - २०२४ साठी थरार.....…...!