शिवाजीनगर मतदार संघात कार्यसम्राट मोफत महा- आरोग्य शिबीर

तपासणी पासून- शस्रक्रियेपर्यत सर्वकाही, नागरिकांनी लाभ घेण्याचे निमंत्रक सनी विनायक निम्हण यांचे आवाहन

पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात २२ जुलै ते ६ आॕगस्ट या कालावधीत मोफत ‘कार्यसम्राट महा- आरोग्य शिबीर’ होणार आहे. दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकप्रिय उपमुख्यमंत्री, माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिबिराची सुरवात २२ तारखेपासून करण्यात येणार आहे.

सुप्रसिद्ध सोमेश्वर फाउंडेशन यांच्या तर्फे शिबीराचे आयोजन केले असून तीन महत्वपूर्ण टप्प्यात शिबीर होणार आहे.पहिल्या टप्प्यात, २२ ते ३० जुलै या कालावधीत घरोघरी जाऊन रूग्णांची पुर्व तपासणी व नोंदणी केली जाणार आहे.

दूसऱ्या टप्प्यात ३१ जुलै ते ४ आॕगस्ट या कालावधीत, सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात पंचवीस ठिकाणी, पूर्ण तपासणी, प्राथमिक उपचार, मुख्य शिबीराची नोंदणी, ५२ प्रकारच्या रक्त चाचण्या,
एक्स-रे, सोनोग्राफी, इ.एम.जी, इ.सी.जी, २-डी इको, इ.इ.जी, मेमोग्राफी (स्तनाच्या कॅन्सरची तपासणी) पी.एफ.टी करण्याचे योजिले आहे.

तिसऱ्या टप्प्यात मुख्य शिबीराचे उदघाटन लोकप्रिय उपमुख्यमंत्री, माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते, ६ ऑगस्ट रोजी, सकाळी ९ वाजता,
कृषी महाविद्यालयाचे मैदान,सिंचन नगर, भोसलेनगर पुणे या ठिकाणी होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे असणार आहेत. प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, महसूल मंत्री अब्दुल सत्तार, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आदी सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित असणार आहेत. शिबीर दुपारी ४ वाजेपर्यंत चालणार असून जगविख्यात डॉक्टरांचा सल्ला, तपासणी, औषधोपचार व पुढील शस्रक्रिया नोंदणी केली जाणार आहे.

शिबिरात प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ.रमाकांत देशपांडे, हाडांचे तज्ज्ञ डॉ. के.एच संचेती, नेत्र शल्यचिकित्सक डॉ.विकास महात्मे यांच्यासह पुणे, मुंबई येथील नामांकित आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.

See also  डॉ.शामाप्रसाद मुखर्जी आरोग्यविषयक योजना सुरु करण्यासाठी पतित पावन आक्रमक

मोफत सल्ला, तपासणी-चाचणी, औषधोपचार व पुढील शस्रक्रिया केली जाणार आहे. यामध्ये नेत्ररोग, अस्थिव्यंग उपचार, मेंदू रोग, मुत्र रोग, नाक – कान – घसा, कर्करोग, जनरल मेडिसीन, ग्रंथीचे विकार, त्वचा व गुप्तरोग, अयुष हृदयविकार, जनरल सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, बालरोग, स्त्रीरोग, दंतरोग, श्वसनविकार व क्षयरोग, लठ्ठपणा, जेनेटिक विकार, मानसिक आरोग्य अशा अनेक आजारांवर मोफत तपासणी,औषधोपचार, शास्रक्रीया केली जाणार आहे. गरजू नागरिकांनी आधिक माहितीसाठी ८३०८१२३५५५ या नंबरवर संपर्क करावा किंवा www.sunnynimhan.com या वेबसाईटवर नोंदणी करावी.