पुणे : भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मिलिंद कदम यांच्या माध्यमातून औंध मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे , ॲड डॉ. मधुकर मुसळे, भाजपा कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे माजी अध्यक्ष प्रकाश बालवडकर, रंजीत लोखंडे, रोहित मस्के, विजय ठोसर आदी उपस्थित होते.
यावेळी औंध येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहती मधील शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके वाटप करण्यात आले. तसेच शाहीर अण्णाभाऊ साठे यांना 103 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
























