पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र भुतडा यांची नियुक्ती

पुणे :पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र भुतडा यांची शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी नियुक्ती केली .

शिवाजीनगर मतदार संघातील बोपोडी ब्लॉकचे माजी अध्यक्ष यांची राजेंद्र भुतडा पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र माजी महापौर कमलताई व्यवहारे यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड माजी आमदार अनंतराव गाडगीळ तसेच माझे शिक्षण मंडळ अध्यक्ष संगीता तिवारी राष्ट्रीय मजूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे तसेच अजित दरेकर ,नीताताई राजपूत सर्व ब्लॉक अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. गेली 22 वर्ष बोपोडी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष पद भूषविल्यानंतर आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने शहर उपाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

See also  सुस-म्हाळुंगे हद्दीवर PMPML बस सेवा सुरु, आता लवकरच पाण्याच्या लाईनचे काम सुरु करणार - अमोल बालवडकर