अतिक्रमण विभागाचे उपायुक्त यांच्या सांगण्यावरून होत नाही अनाधिकृत आठवडे बाजारावर कारवाई – मोहल्ला कमिटी मध्ये दिली माहिती

औंध : अतिक्रमण विभागाचे उपायुक्त यांच्या सांगण्यावरून अनाधिकृत आठवडे बाजारावर कारवाई होत नसल्याची माहिती औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या मोहल्ला कमिटीच्या बैठकीमध्ये अतिक्रमण निरीक्षकांनी दिली.

बालेवाडी रेसिडेन्शिअल असोसिएशनच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या भाजी मंडई बंद ठेवून त्याच्या शेजारी होत असलेल्या आठवडे बाजारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच बाणेर बालेवाडी पाषाण औंध परिसरामध्ये रस्त्यांवर भरवण्यात येणारे आठवड्या बाजार परवानगी नसताना भरवण्यात येत आहेत. यावर कारवाई कधी करण्यात येणार असा प्रश्न मोहल्ला कमिटीच्या बैठकीमध्ये मांडण्यात आला.

औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण सुतारवाडी परिसरातील कचरा प्रश्न याबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले. स्वच्छ संस्थेला कचरा वर्गीकरण साठी देण्यात आलेल्या जागा सुका कचरा ठेवण्यासाठी असताना या ठिकाणी ओला कचरा आणला जात असल्याचे निदर्शनास आणून दिले.


औंध येथील राजमाता जिजाऊ स्मारकाचे काम पूर्ण व्हावे तसेच या परिसरातील स्वच्छता व मुतारीची दुर्गंधी यावर उपाययोजना करण्यात याव्यात. पुणे महानगरपालिकेच्या इमारती माजी नगरसेवकांच्या माध्यमातून खाजगी वापरासाठी तसेच भाडे तत्त्वावर सार्वजनिक वापरासाठी देण्यात येत असून इमारतींची पाहणी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी गणेश कलापुरे यांनी केली.

आनंदबन क्लब परिसरातील कचरा समस्या सोडवण्यात यावी कचरा वर्गीकरण शेड हवे तसेच कचरा वेळेवर उचलला जात नाही असे अशोक मुरकुटे यांनी सांगितले.

पुष्कर कुलकर्णी यांनी सुसरोड परिसरातील खड्डे, तसेच बंद असलेल्या मुतारी, कचऱ्यांचे प्रश्न व साईचौक ते शिवनगर परिसरातील ओवर हेड विद्युततारांमुळे वारंवार झाडे तोडावी लागत असल्याचे सांगितले.

नाना वाळके यांनी औंध मधील पार्किंगचा प्रश्न तसेच डीएव्ही शाळेजवळील तोडण्यात आलेली मुतारी पुन्हा बांधण्यात यावी. तसेच औंध परिसरातील कचरा वेळेवर उचलण्यात यावा अशी मागणी केली.

बाणेर पाषाण लिंक रोड परिसरातील कचरा वर्गणीकरणाचे शेड हलवण्यात यावे. तसेच बाणेर पाषाण लिंक रोड रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. व अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी बाणेर पाषाण लिंक रोड असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चत्तुर यांनी केली.

बालेवाडी रेसिडेन्शिअल असोसिएशनचे पदाधिकारी अमेय जगताप, माशाळकर, मोरेश्वर बालवडकर यांनी बालेवाडी कधीतरी विविध प्रश्न उपस्थित केले.

यावेळी औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, अभियंता, मुख्य पथक विभागाचे अधिकारी, पाणीपुरवठा अधिकारी, महावितरणचे अधिकारी, तसेच क्षत्रिय कार्यालयातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

See also  प्रशासनाची वाट न बघता ट्रॅफिक समस्येवर भुगाव ग्रामस्थांनी केले यशस्वी उपाय