सोमवारी पुणे विभागातील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण

पुणे : मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पुणे विभागातील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसाठी (ईआरओ) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार ४ सप्टेंबर रोजी विभागस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आहे आहे.

भारत निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिनांक ७ ऑगस्ट २०२३ रोजी इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट नवी दिल्ली येथे मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) यांच्यासाठी प्रशिक्षण आयोजीत केले होते. त्यासाठी राज्यातील २५ मतदार नोंदणी अधिकारी यांचे नामांकन करण्यात आले होते. या प्रशिक्षीत अधिकाऱ्यांकडून राज्यातील उर्वरीत मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत ४ सप्टेंबर २०२३ पुणे विभागीय स्तरावर प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले आहे. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील २१ सातारा ८, सोलापूर ६, कोल्हापूर १० आणि सांगली जिल्ह्यातील ७ ईआरओ उपस्थित राहणार आहेत, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी कळविले आहे.

See also  मतदारांनी निर्भयपणे आणि नैतिकतेने मतदान करावे-उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे