32 व्या अखिल भारतीय जी.व्ही. मावळणकर शॉर्टगन शूटिंग स्पर्धेत रोशनी शेख, स्मिता सावंत यांची सुवर्ण पदकाची कमाई

पुणे : 32 व्या अखिल भारतीय जी.व्ही. मावळंकर शॉर्टगन शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये रोशनी सिराज शेख हिने ज्युनियर महिला गटात सुवर्णपदक आणि महिला गटात सुवर्णपदकाची तर नरेंद्र इंद्रमण सिंग याने रौप्यपदक जिंकले.

डबल ट्रॅप स्पर्धेत स्मिता सावंत हिने दोन सुवर्णपदक तर रोशनी सिराज शेख हिने दोन रौप्य पदक व विवेक सावंत यांनी एक कांस्यपदक जिंकले.

बालेवाडी येथे हे नेमबाज हेमंत बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. विजेत्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.

See also  आयुक्त नवल किशोर राम यांनी पुणे भारताची सायकल राजधानी बनणार अशी घोषणा करणे म्हणजे वास्तवापासून पूर्णपणे दूर जाणं - प्रशांत कांबळे