कोकाटे तालीम मंडळ व लोकसेवा स्कूल यांच्या माध्यमातून पाषाण येथे शाडू माती पासून गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न

पुणे : लोकसेवा प्रतिष्ठान आणि कोकाटे तालीम मंडळाच्या वतीने पाषाण सूसरोड येथे लोकसेवा स्कूल मध्ये गणपती बनवा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

जवळपास २००० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेऊन गणेशमूर्ती बनविण्याचा आनंद लुटला.या कार्यशाळेला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन, बालकलाकारांना प्रोत्साहन दिले. यावेळी लोकसेवा प्रतिनिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार दीपक पायगुडे, राहुल कोकाटे, मयुरी कोकाटे श्री रत्नाकर मानकर, श्री रघुनाथ उत्पात, श्री उत्तम जाधव, श्री रोहन कोकाटे, श्री सचिन दळवी ,श्री शिवम सुतार, श्री प्रवीण आमले, श्री नवनाथ ववले सौ वंदना सिंग,सौ पुनमताई उपस्थित होते.

पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष व कोकाटे तालीम मंडळाचे अध्यक्ष श्री राहुल कोकाटे व लोकसेवा स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. चैत्राली जैन व CARE संस्थेचे श्री मयूर ठेंगे यांनी सदर कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले.

See also  मोहिते पाटलांच्या " बलराज " अश्वाचे देहूकडे प्रस्थानआज जगतगुरुंच्या पालखीचे श्री क्षेत्र पंढरीकडे प्रस्थान