कोथरुड : कोथरुड हे माझं घर आहे. त्यामुळे मला घरात ज्या सोईसुविधा मिळतात. त्या मतदारसंघातील सर्वांना मिळाल्या पाहिजेत, असा माझा आग्रह आहे. तसेच, कोथरुडमधील एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, हीच अंबाबाईची सेवा आहे, असे प्रतिपादन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केला. शास्त्रीनगर मध्ये नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नातून २५ लाख रुपये लोकसहभागातून खर्चून ड्रेनेज लाईन टाकण्यात आली. या कामाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजपा शहर सरचिटणीस पुनित जोशी, कोथरुड मतदारसंघाचे सहप्रमुख नवनाथ जाधव, माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, नगरसेविका श्रद्धा प्रभुणे पाठक, अल्पना वर्पे, गणेश वर्पे, कैलास मोहोळ, बाळासाहेब टेमकर यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोथरुड माझे घर आहे. त्यामुळे मला माझ्या घरात सोईसुविधा आवश्यक असतात, त्या कोथरुडमधील प्रत्येक नागरिकाला देण्याचा माझा प्रयत्न आहे. या भागातील ड्रेनेज लाईनचे कामाची माहिती मला मिळाली. तेव्हा तातडीने लोकसहभागातून २५ लाख रुपये खर्चून ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण केले.
ते पुढे म्हणाले की, आज घटस्थापनेच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये आई अंबाबाईचा जागर सुरू होतो.पण त्याबरोबरच कोथरुड मधील एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, असा माझा आग्रह आहे. एकप्रकारे हीच अंबाबाईची सेवा आहे, असे मला वाटते. त्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनीही त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनित जोशी यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, नामदार चंद्रकांतदादा पाटील हे संवेदनशील मनाचे नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्या समोर एक जरी समस्या मांडली, तर ते तातडीने सोडवतात. ही खऱ्या अर्थाने चंद्रकांतदादांची स्टाईल झाली आहे. असे गौरवोद्गार काढले.
दरम्यान, यावेळी ड्रेनेज लाईनचे काम तातडीने पूर्ण केल्याबद्दल, भागातील नागरिकांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले.
घर पुणे -उपनगर मतदारसंघातील एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये हीच अंबाबाईची सेवा – ना.चंद्रकांत...