खडकी : खडकी रेल्वे स्टेशन जवळ ॲम्युनेशन फॅक्टरी आणि किर्लोस्कर फॅक्टरी यांना जोडणारा रेल्वे ट्रॅक पुणे – मुंबई रस्त्यास , खडकी स्टेशन व एल्फिन्स्टन रोड, बोपोडी या ठिकाणी क्रॉस होत आहे. सदर रेल्वे ट्रॅक सुमारे 100 वर्षापूर्वी टाकनेत आला होता. अलीकडे त्याची पातळी रस्त्याचे लेव्हल पेक्षा 1 ते दीड फूट खाली असल्यामुळे पावसाळ्यात पाणी साठणे, वाहने घसरणे या घटना घडत होत्या. आमदार सिद्धार्थ शिरोळे साहेब यांनी Divisional railway manager, पुणे यांचेकडे पुणे महानरपालिकेच्या अधिकारी समवेत बैठक घेऊन चर्चा एक महिन्यापूर्वी केली होती. त्यानुसार रेल्वे ट्रॅक रस्त्याचे पातळीत घेणेचे ठरले. रेल्वे ट्रॅक खालील सेवा वाहिन्या बऱ्याच जुन्या व कमी क्षमतेच्या होत्या. सदर संधीचा फायदा घेऊन पथ विभागामार्फत पावसाळी लाईन, ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन व केबल डक्ट रेल्वे ट्रॅक खालून टाकनेचे समन्वय साधून नियोजन केले. जेणेकरून भविष्यात रेल्वे ट्रॅक खालून सेवावहिण्या टाकण्याची गरज भासणार नाही. गेल्या शनिवारी एल्फिन्स्टन रस्त्यावरील ट्रॅक रस्त्याचे समपातळीत घेतला. या शुक्रवारी रात्री ते रविवार रात्री पुणे मुंबई रस्त्यावरील अर्ध्या ( 21मिटर) लांबीचा रस्ता क्रॉस करून वाहतुकीस उपलब्ध करीत आहोत. पुढचे शुक्रवारी ते रविवार रात्री राहिलेला अर्धा रस्ता क्रॉस करणेचे नियोजन आहे.
या कामासाठी मा. ढाकणे साहेब ( अति.महा. आयुक्त) व मा. मगर साहेब ( उप आयुक्त – वाहतूक) यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सदरचे काम पथ विभागाचे दिनकर गोजारे ( कार्य कारी अभियंता) , सुशांत कुमार ( रेल्वे अधिकारी) व मा. मासाळकर ( पोलिस निरीक्षक, वाहतूक) यांचे प्रत्यक्ष नियंत्रणाखाली करणेत येत आहे.
