जनकल्याणासाठी पुण्यात दोन्ही दादा एकत्र चंद्रकांत दादा म्हणाले, पण बाणेर मध्ये अजित पवार यांच्या गटाच्या बॅनर वर शरद पवारांचे फोटो

पुणे : जनकल्याणासाठी पुण्यात दोन्ही दादा एकत्र असल्याचे प्रतिपादन नामदार चंद्रकांत पाटील यांनी बाणेर येथील कार्यक्रमात केले. मात्र बाणेर मधील अजितदादा गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बॅनरवर शरद पवार यांचे फोटो झळकत असल्याने नक्की अजित दादा पवार गट कोणासोबत असा उपस्थित होत आहे.

बाणेर बालेवाडी सुस महाळुंगे परिसरात मध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाकडून सरंजाम वाटपासाठी लावण्यात आलेल्या बॅनर वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे फोटो टाकण्यात आले आहेत. यामुळे अजित दादा पवार गटाला शरद पवार यांच्या फोटो वापरल्या शिवाय पुणे शहरात पर्याय नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

बाणेर बालेवाडी परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवर मंत्री धनंजय मुंडे, अजित दादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, आमदार निलेश लंके यांचे फोटो असून शरद पवार यांचा फोटो पार्थ पवार यांच्या शेजारी बॅनर वर लावण्यात आला आहे. बाणेर बालेवाडी सूस महाळुंगे परिसरामध्ये अजित पवार यांच्या गटाकडून सोईस्कर रित्या शरद पवार यांचे फोटो वापरण्यात येत असल्याची चर्चा सध्या होत आहे.

शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार असल्याने राष्ट्रवादी पक्षामध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. तसेच निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या केस मध्ये देखील पक्षांवर दावे सांगितले जात असल्याने पुण्यात मात्र अजित दादा पवार गटाकडून सर्कसपणे शरद पवार यांचे फोटो बॅनर वर लावले जात आहेत.

पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील बाणेर येथील सोसायटी यांच्या जाहीर कार्यक्रमांमध्ये “दोन्ही दादा एकत्र” हे आवर्जून सांगत असले तरी अजित दादा पवार यांचा गट मात्र शरद पवार यांच्या प्रेमातच आहे हे मात्र दिवाळीनिमित्त लागलेल्या बॅनर वरून अधोरेखित होते.

See also  टिंबर मार्केट येथील आगीच्या घटनास्थळाची पालकमंत्र्यांकडून पाहणी