निवासी मिळकत धारकांना 40 टक्के कर सवलतीसाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत वाढ मिळावी सुनील माने यांची मागणी

पुणे : पुणे महापालिकेतील निवासी मिळकत धारकांना ४० टक्के कर सवलतीसाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे सुनील माने यांनी निवेदन देत केली.

सध्या महानगरपालिकेकडून निवासी मिळकत धारकांना ४० टक्के कर सवलत देण्यासाठी मागणी अर्ज पीटी ३ स्वीकारणे सुरु आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर आहे. या अर्जासोबत रहिवासी पुरावा देणे बंधनकारक आहे. मात्र या आधी ज्यानी कगदपत्रे काढलेली नाहीत किंवा ज्याना कागदपत्रे ट्रान्सफर करायची आहेत, त्यांना दिवाळी मुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. कारण बहुतांश कार्यालये दिवाळीच्या निमित्ताने सुट्टी असल्याने बंद आहेत. तसेच अनेकजण दिवाळी सुट्टीसाठी बाहेरगावी गेले आहेत. परिणामी अनेक नागरिकांना या ४० टक्के मिळकत सवलती पासून वंचित राहावे लागणार आहे.
याबाबत आपण विचार करून रहिवासी पुरावा सादर करण्यासाठी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.


See also  महाराष्ट्राचा मॅग्नेट प्रकल्प फुलशेतीसाठी वरदान - अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार