पुणे: आजचे मोदी हे बाळासाहेब ठाकरेंची कृपा असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान या मेळाव्यात ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत बोलत होते. पुण्यातील आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर ठाकरे गटाकडून जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, संपर्क प्रमुख आमदार सचिन आहेर, आदित्य शिरोडकर, शशिकांत सुतार, चंद्रकांत मोकाटे, शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे आदी उपस्थित होते.
या देशाचा काळ पैसा जो बाहेर गेला त्याच काय झालं, असा सवाल राऊतांनी यावेळी उपस्थित केलाय. 15 लाखाचा काय झालं,भ्रष्टाचारांना फासावर लटकावू उद्याचं काय झालं, अजित पवार हसन मुश्रीफ यांचं काय झालं, प्रफुल पटेल भावना गळी राहुल शेवाळे यांचे काय झालं. ईडी त्यांना अटक करायला गेली होती, त्याचं काय झालं, हे प्रश्न देखील राऊतांनी या निमित्ताने उपस्थित केले आहेत. देशातला दहशतवाद पूर्णापणे संपवू असं सांगितलं होतं मणिपूर मध्ये काय सुरू आहे. आम्हाला डोळे वटारुन दाखवता चीनला डोळे वटारा.
आजही हजारो काश्मीर पंडित निर्वासितांचे जीवन जगतात, काश्मिरी पंडितांच काय झालं ते सांगा. अनेक काश्मिरी पंडित बाळसाहेब ठाकरे यांना मानतात. कारण बाळासाहेबांनी कश्मीरी पंडितासाठी काम केलं याला म्हणतात हिंदुहृदयसम्राट. समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार होतात कुठे आहे पुतळा. हे एक नंबरचं खोटं सरकार देशात आहे, असं राऊतांनी म्हटलं. डरपोक लोकांनी शिवसेना घाबरून शिवसेनेला फोडलं. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी काय केलं मराठी माणसाच शौर्य संपवण्याच काम केलं. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले हे त्यांच्या मनात आहे.
शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच.ही शिवसेना कुण्या आयऱ्या गैऱ्याची नाही. आशा एकनाथ शिंदेंना देता आणि तुम्ही सांगता का ही शिवसेना तुमची? शरद पवार साहेब हयात आहेत, निवडणूक आयोगासमोर जाऊन बसतात तरी निवडणूक आयोगाला प्रश्न पडला की राष्ट्रवादी कोणाची. उद्धव ठाकरे असताना निवडणूक आयोगाला प्रश्न पडतो की शिवसेना कुणाची, राज्यात सध्या काय सुरू आहे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री, एक फुल दोन डाऊट फुल, असं म्हणत राऊतांनी सरकारवर निशाणा साधला.
मला जेलमध्ये नेले तेव्हा माझ्यावर देखील दबाव आणला गेला..पण मी शिवसेना सोडणार नाही. शिवसेनेची बेईमानी करण्यापेक्षा मरण पत्कारीन. मी घाबरून पळून जाणार नाही. 40 डरपोक पळून गेले पण लाखो मर्दानी सैनिक आमच्या सोबत, हा महाराष्ट्र झुकणार नाही. असे शिंदे मिंदे किती आले आणि गेले. या देशात अनेक सेना आल्या पण शिवसेना आजही तशीच आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.