दिघी बंदर ते पुणे सिमेंट रस्त्याचे काम दर्जाहीन, कारवाईची मागणी

कोथरूड : मुळशी तालुक्यातील दिघी बंदर ते पुणे या रोड चे काम चालु आहे या रोडच काम दर्जाहीन व निकृष्ट आहे. या बावधन येथील विभागात काम येत आहे या रोडचा कामातील सिमेंट निघुन गेले आहे. आत्ता खडी दिसत आहे.सदर पिरंगुट ते बावधन या ठिकाणीं काम चालु असून ठीक ठिकाणी रोडवर खडी व माती आली आहे. त्यामुळे दुचाकीस्वार यांचे छोटे मोठे अपघात देखिल होत आहे.

मुळशी तालुक्यांतील रोडची सुरवातच असा दर्जाहिन कामाने होत आहे. सदर कामाला एक महिना झालाय झालाय तर ही आवस्था झाली आहे पावसाळा आला की येथे खड्डे पडून मोठे तळे साठणार आणि ट्रॅफिक जॅम होणार वास्तविकता जागृत सरकार या विषयाकडे लक्ष देणार का? संबधित कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई होणार का? याला घोटाळा म्हटलं तर चालेल का? हीच महायुती सरकारची गॅरंटी आहे का? अशा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कामाची दर्जा व दुरुस्ती करा अन्यथा ठिय्या आंदोलन युवासेना उपजिल्हा अधिकारि अमित कुडले, उपजिल्हा संघटक सचिन दगडे, युवासेना तालुका अधिकारि राम गवारे, उपतालुका प्रमुख कालिदास शेडगे , वैभव पवळे, नामदेव टेमघरे, कृष्णा पानसरे, योगेश काशीलकर यांच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.

See also  अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन