नवमतदारांचा नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

मुंबई, दि.23 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च, 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. दिनांक 17 ते 22 मार्च 2024 या कालावधीत राज्यात 1 लाख 84 हजार 841 इतक्या नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ येथे लोकसभा निवडणूक 2024 बाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजि पत्रकार परिषदेत श्री. एस. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) डॉ.राहुल तिडके,  अवर सचिव  तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये दिनांक 19.04.2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठीचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 20.03.2024 पासून सुरु झाली आहे, नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 27.03.2024 असा आहे, नामनिर्देशनपत्राची छाननी दि.28.03.2024 रोजी आहे, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 30.03.2024 असा आहे. त्या दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी निश्चित होईल.

आजपर्यंत रामटेक-1, नागपूर-5,भंडारा-गोंदिया-2,गडचिरोली-चिमुर-2 व चंद्रपूर – 0 इतके नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाले आहेत.

पहिल्या टप्प्यातील 5 लोकसभा मतदारसंघातील मतदारांबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे

9- रामटेक मतदारसंघात पुरुष मतदार 10 लाख 44 हजार 393, महिला मतदार 10 लाख 3 हजार 681, तृतीयपंथी मतदार 52, एकूण 20 लाख 48 हजार 126, मतदान केंद्रे 2 हजार 405 आहेत.

10 – नागपूर मतदारसंघात पुरुष मतदार 11 लाख 12 हजार 739, महिला मतदार 11 लाख 9 हजार 473, तृतीयपंथी मतदार 222, एकूण 22 लाख 22 हजार 434, मतदान केंद्रे 2 हजार 105 आहेत.

11- भंडारा-गोंदिया मतदारसंघात पुरुष मतदार 9 लाख 09 हजार 170, महिला मतदार 9 लाख 17 हजार 124, तृतीयपंथी मतदार 14, एकूण 18 लाख 26 हजार 308, मतदान केंद्रे 2 हजार 133 आहेत.

12-गडचिरोली –चिमुर मतदारसंघात पुरुष मतदार 8 लाख 14 हजार 498, महिला मतदार 8 लाख 02 हजार 110, तृतीयपंथी मतदार 10, एकूण 16 लाख 16 हजार 618, मतदान केंद्रे 1 हजार 891 आहेत.

13-चंद्रपूर मतदारसंघात पुरुष मतदार 9 लाख 45 हजार 468,  महिला मतदार 8 लाख 91 हजार 841, तृतीयपंथी मतदार 48, एकूण 18 लाख 37 हजार 357, मतदान केंद्रे 2 हजार 118 आहेत.

See also  महाविकास आघाडीने अडीच वर्षात नऊ लाख कोटींचे प्रकल्प रोखले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर निशाणा