रांजे (ता. भोर) येथील टप कोट या रंगाच्या कंपनीला लागलेल्या आगे मध्ये लाखो रुपयांचे नुकसान

पुणे : खेड शिवापूर ते कोंढणपूर यादरम्यान असलेल्या रांजे (ता. भोर) येथील टप कोट या रंगाच्या कंपनीला बुधवारी (दि. २७) आग लागली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले  आहे.


त्याचप्रमाणे सभोवताली असलेल्या कंपन्या देखील या आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची शक्यता आहे. रांझे (ता. भोर) ग्रामपंचायतीच्या हद्दीत टपकोट नावाची रंग तयार करण्याची कंपनी आहे. त्या कंपनीला बुधवारी साधारण साडे दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. रंगाची कंपनी असल्यामुळे केमिकल व इतर ज्वलनशील पदार्थ कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात होते.

त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले, त्याचप्रमाणे या आगीमुळे त्याच्या शेजारील असलेल्या कंपनींना देखील आग लागली आहे. घटनास्थळावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( PMRDA) अग्निशमन दल एक वॉटर कॅनन हायर टेंडर रेस्क्यू टेंडर असे तिन वाहने आगीच्याठीकानी असून आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

See also  सारथी संस्थेमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती करण्यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, 'स्वराज्य' पक्षाची मागणी - डॉ. धनंजय जाधव (स्वराज्य सरचिटणीस)