औंध येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

औंध : औंध येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून 103 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.


यावेळी चतु:शृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे,  माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाना वाळके, योगेश भोसले, लहू बालवडकर, राहुल बालवडकर, रमेश ठोसर, निलेश ठोसर, महादेव साळवे आदी उपस्थित होते.

यावेळी सर्व राजकीय पक्ष व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते.

See also  बारामती शिरूर व पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या