लोहिया नगर परिसरात स्वच्छता व जलस्त्रोतांची निगा याबाबत जनजागृती रॅली

पुणे : महापालिका सहाय्यक आयुक्त भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत “सफाई अपनाओ बीमारी भगाओ अभियान” व “स्वच्छ सर्वेक्षण 24” मध्ये गंज पेठ येथील आचार्य विनोबा भावे iTeach AVB इंग्लिश मेडियम स्कूल मधील विद्यार्थी व शिक्षक यांचे सहभागाने गंज पेठ, लोहीयानगर परिसरात स्वच्छता व जलस्त्रोतांची निगा राखणे इत्यादी बाबत जागरूकतेच्या संदेश प्रसाराची रॅली, स्वच्छतेची शपथ विधी व महात्मा फुले वाडा परिसरात विशेष स्वच्छता मोहिम घेणेत आले.


 सदरचे अभियान मा. उप आयुक्त श्री. अविनाश सपकाळ सर (परिमंडळ ५), मा.उप आयुक्त श्री. संदीप कदम सर (घनकचरा व्यवस्थापन कार्यालय), मा.महापालिका सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे (धूमाळ)मॅडम यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री राहुल राजगोळकर, शिक्षक शकील तडवी आरोग्य निरीक्षक निलेश चव्हाण,राजू बागूल, नितीन सांळूके,चंद्रवर्धन गायकवाड, स्कूल सोशल वर्कर हनुमान मेकडे, नरसिंग शिंदे, मोकादम व सेवक वर्ग उपस्थित होते.

See also  बाणेर येथील अखिल न्यू बाणेर मित्र मंडळ व साम्राज्य ग्रुप व्यापारी संघटना यांच्यावतीने दरवर्षी दहीहंडीचे आयोजन