“विकास भी और विरासत भी” – खासदार डॉ.मेधा कुलकर्णी यांची केंद्रीय अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया

पुणे : प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या तिसऱ्या टर्म मधील  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेले हे बजेट म्हणजे “विकास भी और विरासत भी” हा अजेंडा घेऊन सादर केलेले बजेट आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा बजेट सादर केले. त्याबद्दल त्यांचेअभिनंदन करते असे खासदार मेधा कुलकर्णी यांनी अर्थसंकल्पावर मत मांडताना सांगितले.
1) प्रामुख्याने महिलांच्या साठी खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद ही करण्यात आलेली आहे. तीन लाख करोड एवढ्या मोठ्या प्रमाणात तरतूद करून महिला आणि मुलींसाठी सक्षमीकरणाच्या अनेक योजना राबवल्या जाणार आहेत.
2) एक करोड युवकांसाठी इंटर्नशिप प्रोग्रॅम राबवल्या जाणार असून या युवकांना प्रशिक्षण आणि पाच हजार रुपयांचे मानधन हे देण्यात येणार आहे.
3) लो इन्कम ग्रुप साठी इन्कम टॅक्स मध्ये दिलासा देण्यात आला असून पन्नास हजाराची मर्यादा 75000 केली आहे. आणि पहिल्या स्लॅब शून्य ते अडीच  वरुन शून्य ते तीन करण्यात आला आहे. त्याचबरोबर तीन ते पाच स्लॅब वाढवून तीन ते सात चा स्लॅबला 5% टॅक्स बसणार आहे.  हा एक मोठा दिलासा लो इन्कम ग्रुप च्या नागरिकांना मिळाला आहे.

4)इलेक्ट्रॉनिक गुड्स त्याचबरोबर कॅन्सर सारख्या दुर्धर रोगांवरील औषधे आणि इक्विपमेंट्स यावर्षी ड्युटी  रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे आरोग्य विषयक सुविधा या अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळू शकतील.
5) मुद्रा योजनाची मर्यादा दहा लाखावरून वीस लाखापर्यंत केलेली आहे. त्यामुळे नवीन स्टार्टअप साठी ज्यांना दहा लाख कर्जाची मर्यादा कमी पडत होती त्यांना आता वीस लाखापर्यंत कर्ज मिळू शकणार आहे.

7)  पूर्वोदय योजनेच्या माध्यमातून पूर्वेकडील सर्व राज्यांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ मिळून त्यांचा विकास करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
8) टुरिझमच्या माध्यमातून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलेला आहे. विष्णुपद, महापद, काशीविश्वनाथ यासारखे कॉरिडॉर्स तयार करून त्या ठिकाणची तीर्थक्षेत्र हे विकसित करून टुरिझमला चालना देण्यात देण्यात येणार आहे. नालंदा या विश्वविद्यालय केंद्रात सुद्धा टुरिझम वाढावे या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जाणार आहेत.

9) देशातील 40 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 14 शहरांसाठी क्रिएटिव्ह रिडेव्हलपमेंट सिटीज साठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येऊन ग्रोथ हब तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतर शंभर शहरांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येणार आहे.
10) तीन करोड आवास योजनेतल्या घरांसाठी चे टारगेट ठेवण्यात आले आहे.
11)  शासनाच्या माध्यमातून विविध राज्यांमध्ये रेंटेड हाऊसेस हे कर्मचाऱ्यांसाठी आणि स्थलांतरित अशा नागरिकांसाठी दिलासा ठरणार आहेत.

देशाला प्रगतीच्या मार्गावर नेऊन अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी देशाला सज्ज करणारे असे हे बजेट आहे.  हे बजेट सादर केल्याबद्दल  केंद्रीय वित्तमंत्री निर्मलाजी सितारामन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन मेधा कुलकर्णी यांनी केले.

See also  ससून सर्वोपचार रुग्णालय येथील ड्रग्जबाबत चौकशी अहवाल शासनास सादर; अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ. देवकाते यांचे निलंबन करुन विभागीय चौकशी