सुतारवाडी स्मशानभूमी विविध विकास कामांचे भूमिपूजन

सुतारवाडी : आमदार चंद्रकांतदादा पाटिल यांचा माध्यमातुन व पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष श्री  राहुल कोकाटे यांचा पाठपुराव्याने सुतारवाडी येथील स्मश्नभूमीतील विविध विकासकामांच भुमीपूजन आज करण्यात आले. स्मशानभूमीतील पावसाळी लाईन,ड्रेनेज लाईन,गार्डन मधील कामे,स्पीकर सिस्टिम,गरम पाण्याची व्यवस्था,नागरिकाना बसायला म्याट आदि विकासकामे आमदार श्री चंद्रकांत दादा पाटिल व पुणे मनपाचा माध्यमातून होणार आहे असे श्री राहुल कोकाटे यांनी सांगितले.

हभप दत्तात्रय दहिभाते, संत सेवक मारुती कोकाटे, हभप दिलीप रणपिसे,जेष्ठ समाजसेवक सोपान बालवडकर,बालमतात्या सुतार,महेश सुतार,हभप बाळासाहेब सुतार, युवा नेते रमेश सुतार,अंकुश रणपिसे,विनोद खेडेकर,अशोक रणपिसे,रामचंद्र फाले,सोनबा सुतार,जयसिंग सुतार,अण्णा नलावडे,ज्ञानेश्वर वळे,आदि मान्यवरांचा शुभःस्ते शुभारंभ करण्यात आला.

भाजप कोथरुड(उ.) चे अध्यक्ष सचिन पाषाणकर,स्वि.नगरसेवक शिवम सुतार,उत्तम जाधव,सचिन दळवी,सचिन सुतार,नवनाथ ववले, सुशिल सरकाटे,प्रविण आमले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

See also  कांदा उत्पादकांचे नुकसान होऊ नये यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी बोलणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस