पुणे, ११ डिसेंबरः फेडरेशन ऑफ मोटर स्पोटर्स क्लब्स ऑफ इंडिया (एफएमएससीआय) या भारतातील मोटरस्पोटर्सच्या राष्ट्रीय प्रशासकीय संस्थेच्या मान्यतेखाली होणार्या इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप स्पर्धेची अंतिम आणि निर्णायक फेरी पुण्यामध्ये होणार आहे.
भारतातील अव्वल आणि सर्वोत्तम रायडर्स या राष्ट्रीय विजेता ठरवणार्या फायनलमध्ये सहभागी होणार असून या टु-व्हिलरच्या डर्ट-रेस चा (मातीवरच्या शर्यतीचा) थरार पुणेकरांना अनुभवता येणार आहे. रॅली रेसिंगसाठी कोणतेही प्रवेश-शुल्क आकारण्यात येणार नसून सर्व क्रिडारसिकांना मोफत प्रवेश आहे.
या रोमांचकारी स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना एफबी मोटरस्पोटर्सचे संचालक तसेच ३ वेळेचा राष्ट्रीय रॅली चॅम्पियन आणि मानांकित ग्रेट डेझर्ट हिमालयन रॅलीजचा विजेता फराद भाथेना आणि चिन्मयी भाथेना यांनी सांगितले की, २०२४ मध्ये देशातील विविध रांज्यांमध्ये झालेल्या ५ प्राथमिक फेर्यांनंतर या स्पर्धेची अंतिम फेरी १४ आणि १५ डिसेंबर २०२४ रोजी पुण्याजवळी कामशेत येथील नानोली स्पीड-वे फार्म्स येथे होणार आहे. या फायनल राऊंडसाठी प्रत्येक झोनमधून पात्र झालेले सुमारे १५० अव्वल रायडर्स सहभागी होणार असून या स्पर्धेत राष्ट्रीय अजिंक्यपद विजेता ठरणार आहे. एफएमएससीआय यांच्यावतीने एफबी मोटरस्पोटर्सला २०२४ ते २०२८ या ५ वर्षांच्या कालावधीसाठी इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट टू-व्हिलर चॅम्पियनशीप स्पर्धा आयोजित करण्याचे अधिकार मिळाले आहेत. मातीवरचा, तीव्र चढ-उतार असलेला ट्रॅक आणि त्यावर विविध प्रकारच्या हायस्पीड-सुपर पॉवर असलेल्या बाईक्स् आणि यामध्ये वेग आणि अडथळे पार करणार्या रायडर्सची रोमांचकारी शर्यतीचा अनुभव मिळणार आहे.
‘युरोग्रीप’ या आघाडीच्या टायर उत्पादक कंपनीने या रॅली चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीसाठी प्रायोजक्त्व दिले असून या स्पर्धेसाठी रायडर्सना टायर कंपनीच्यावतीने देण्यात येणार आहे.
फराद भातेना हे स्वतः सुप्रसिध्द रॅली ड्रायव्हर असून त्याला भारतीय मोटर स्पोटर्स सर्कलमध्ये ‘बीग फुट’ म्हणून ओळखले जाते. आपल्याबद्दल सांगताना फराद म्हणाले की, माझे आई-वडील, बहीण आणि भाऊ असे संपूर्ण कुटूंबच रेस आणि रॅली करत असून माझे हे कुटूंब मोटरस्पोटर्स आयकॉन्स् म्हणून ओळखले जाते. फराद याने भारत आणि दक्षिण-पुर्व आशियातील २०० हून अधिक रॅली आणि शर्यतींमध्ये भाग घेतला आहे. बीबीसी टॉप गीअर इंडिया यांनी देशातील आतापर्यंतच्या १० सर्वोत्तम ड्रायव्हर्समध्ये स्थान दिले आहे. एफबी मोटर स्पोटर्स ही फराद भातेना यांच्या मालकीची आणि प्रमोटेड कंपनी असून मोटर स्पोर्टींग रेसिंग कार्यक्रम आयोजन करण्याचे काम करते.
पुण्यामध्ये होणार्या अंतिम स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना फराद आणि चिन्मय म्हणाले की, राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेले सचिन डी., नटराज, असद खान, रेहाना, सिनान फ्रान्सीस, राजेंद्र, स्टेफन रॉय, शामिम खान आणि सय्यद असिफ अलि हे विजेतेपदासाठी झुंझणार आहेत. याशिवाय सुहैल अहमद, युवा कुमार, अमोद नाग, मुंबईचा बादल दोशी, पुण्यातील पिंकेश ठक्कर, हंसराज साईकिया, मधुरीया ज्योती राभा, बंटेलांग जयव्रा असे अव्वल आणि सर्वोत्तम १५० हून अधिक रायडर्स सहभागी होणार आहेत.
या अंतिम फेरीआधी जुन २०२४ पासून या रॅली चॅम्पियनशीपची सुरूवात झाली. चैन्नई येथील मद्रास इंटरनॅशनल सर्किट दक्षिण विभाग अशी पहिली फेरी झाली. २१ जुलै रोजी बंगलौर येथे दक्षिण विभाग दुसरी फेरी, २१ सप्टेंबर रोजी पश्चिम विभाग तिसरी फेरी, ५ ऑक्टोबरमध्ये इंदौर येथे मध्य आणि उत्तर विभाग चौथी आणि पाचवी फेरी २४ नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे पुर्व विभाग झाली होती. या सर्व पात्रता फेरीतून प्रत्येक गटातील अव्वल ठरलेले पहिले पाच रायडर्स अंतिम फेरीत पोहचले आहेत आणि अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले रायडर्स आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीत ११ क्लास (गट) असणार आहेत. या रॅली स्पर्धेत सांघिक अजिंक्यपद, रायडर्स ग्रुप ए, बी, बुलेट क्लास, स्कूटर क्लास, महिला गट, प्रौढ गट असे एकूण १२ गटाच्या विजेतेपदासाठी रायडर्स रेसिंग करणार आहेत.
इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप स्पर्धेतील टु-व्हिलर रॅली स्प्रिंट हा अतिशय रोमांचकारी मोटरस्पोर्ट शर्यत आहे. यामध्ये प्रत्येक टप्पा ६ ते १० किलोमीटरचा असतो. यामध्ये रायडर्स मातीच्या, डांबरी ट्रकवर किंवा डोंगरातील उंच-सखल खडतर अशा रेसिंग मार्गावर आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन करत अंतिम रेषा गाठतात. हाय-स्पीड घेण्यासाठी उत्तम असा सरळ रस्ता किंवा वेड्यावाकड्या वळणांचा घाट रस्ता, या मार्गावरून अचूक नियंत्रण, हवेतून उंच उडी मारून पुन्हा नियंत्रण मिळवणे अशा अनेक आव्हानांचा यशस्वी सामना करून रायडर्स आपली रेस पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. रॅली स्प्रिंटमध्ये बाईक्स्च्या विविध श्रेणींचा समावेश आहे. विशेषकरून सुधारित बाईक्सपासून ते स्ट्रीट बाईक्सपर्यंत रायडर्स वेगवेगळ्या गटात स्पर्धा करतो.