पुणे : मस्साजोग बीड येथे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या विरोधात पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गॅंग यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी महिलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बांगड्या ही पाठवल्या तसेच महिलांनी बांगड्या फोडून या घटनेचा निषेध केला.
या राज्यात महिला लहान मुली सुद्धा सुरक्षित राहू शकत नाही बीड मधील प्रकरणांमध्ये आरोपी अजूनही सापडलेले नाहीत त्यामुळे त्यांना कायद्याचा धाक राहिलेला ज्या पद्धतीने सरपंचांना मारलं गेलं या क्रूर केला ठेचलं यावेळी महिलांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. या आंदोलनाचे नेतृत्व माजी नगरसेविका संगीता तिवारी यांनी यावेळी केलं. या निषेध आंदोलनात शोभा पनीकर, सोनिया ओव्हाळ, सुनिता नेमुर, रजिया बल्लारी, बेबी राऊत, पपीता सोनवणे, मनीषा गायकवाड, भारती लोंढे, इंदू ओव्हाळ, मुक्ता बोरकर, मीना तापकीर, झुंजी जाधव, पुतळाबाई आडागळे, सुवर्णा माने, डावरे ताई या महिला सहभागी झाल्या होत्या.
