सुखाई प्रतिष्ठानच्या वतीने औंध बाणेर बालेवाडी परिसरातील अंगणवाड्यांना गणवेश व बसण्याची चटई वाटप

औंध : सुखाई प्रतिष्ठानच्या वतीने औंध गाव कस्तुरबा वसाहत ,इंदिरा वसाहत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर औंध, बाणेर बालेवाडी येथील अंगणवाडीतील 125 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व बसण्यासाठी चटई देण्यात आल्या.


यावेळी सुखाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कांबळे मुख्याध्यापिका प्रतिभा मुंडे, अंगणवाडी कार्यकर्त्या निवेदिता वाघमारे,शोभा कांबळे, आरती जगताप, स्मिता कांबळे, वनमाला कांबळे, सुनीता वाल्हेकर, स्वाती गराडे, एलिझाबेथ पंडित, अश्विनी पेंढारकर, संजीवनी मोकाशी आदी उपस्थित होते.


औंध बाणेर बालेवाडी महाळुंगे पाषाण येथील सोळा अंगणवाड्यांमधील सुदृढ बालक स्पर्धेतील विजेत्यांना अविनाश कांबळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

See also  "मी" च्या ऐवजी "आम्ही" ला प्राधान्य दिल्यामुळेच योगीराज पतसंस्थेची प्रगती- प्रा. दिगंबर दुर्गाडे