डॉ. मेधा कुलकर्णी, खासदार – केंद्र शासनाचे या वर्षीचे बजेट सर्वसामान्य करदात्यांना दिलासा देणारे, सर्वांना सोबत घेऊन विकास करणारे आहे. 12 लाखापर्यंत टॅक्स माफ केला आहे. शेती, MSME, गुंतवणूक व निर्यात या चार घटनांना विकास इंजिन संकल्पून योजना आखून नियोजन करण्यात आले आहे.
गरीब, युवा, अन्नदाता व नारी या चार घटकांच्या प्रामुख्याने सक्षमीकरणावर भर दिला आहे.
MSME ची मर्यादा 5 लाखावरून 10 वर व 10 वरून 20 वर वाढवली आहे. सक्षम अंगणवाडी, पोषण उपक्रम, कॅन्सरसारखे दुर्धर रोगांवरील उपचार, विद्यापीठांचे पुर्नरूज्जीवन व भारतीय ज्ञान डिपॉझिटरी, अणु-ऊर्जा मिशन अश्या सर्वच क्षेत्रात हा अर्थसंकल्प देशाला नवीन दिशा व प्रगतीकडे नेणारा आहे.